India Vs Australia 4th T20I Cricket Match Live Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील चौथा सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सध्या टीम इंडिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला सलग दुसरा सामना जिंकून मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधायची आहे.
भारत विरुद्धच्या चौथ्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाचे खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरतील.
🚨 Toss Update 🚨
Australia win the toss and elect to bowl in Raipur.
Follow the Match ▶️ https://t.co/iGmZmBsSDt#TeamIndia | #INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/GD0PhQIepF
— BCCI (@BCCI) December 1, 2023
ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने सांगितले की, त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 5 बदल करण्यात आले आहेत. तर भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये 4 बदल केले आहेत. जितेश शर्मा याला संधी देण्यात आली आहे. इशान किशनला ब्रेक देण्यात आला आहे. मुकेश कुमार परतला आहेत.
दरम्यान, टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना दोन विकेटने जिंकला. तर दुसरा सामना भारताने 44 धावांनी जिंकला. मात्र, तिसऱ्या सामन्यात भारताला पाच गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. आता हा सामना जिंकून मालिकेत 3-1 अशी अजेय आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाला मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधायची आहे. तिसर्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देणारा ग्लेन मॅक्सवेल आपल्या देशात परतला आहे. अशा परिस्थितीत संघाला विजयापर्यंत नेण्याची जबाबदारी ऑस्ट्रेलियाच्या युवा खेळाडूंवर असेल.