नेवासा – दैनिक प्रभात आणि वकील बांधवांच्या नात्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वेगळे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे दैनिक प्रभातशी वकील बांधवांची एक वेगळी नाळ जुळलेली आहे. वकील बांधवांना दैनिक प्रभात परिवार आणि वकील मंडळी हा नेहमी एकच आपला परिवार वाटत असल्याचे गौरोद्गार नेवासा न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ आर.आर.येळवंडे यांनी काढले. दैनिक प्रभात परिवाराच्यावतीने वकील बांधवांना वकील डायरीचे वाटप करतांना प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
यावेळी वकील संघाचे अध्यक्ष विधिज्ञ कैलास कापसे, अण्णासाहेब अंबाडे, नितीन अडसुरे, बी. जे. चव्हाण, ए.एम.शेंडे, एस.पी.शिरसाठ, बी.बी.जाधव, एस.पी.माकोणे, यु एम.मोटे, कैलास व्यवहारे, राजू इनामदार यांच्यासह मोठ्या संख्येने वकील बांधव यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी दैनिक प्रभातचे नेवासा तालुका प्रतिनिधी राजेंद्र वाघमारे यांनी प्रास्ताविक केले.
वकील संघाचे अध्यक्ष कैलास कापसे म्हणाले की, दैनिक प्रभात परिवाराशी वकील बांधवांची एक वेगळीच नाळ सुरुवातीपासूनच जोडली गेलेली असून प्रभात परिवार हा वकील बांधवांच्या कुटूंबातील एक सदस्यच असल्याचे गौरोद्गार काढले. विधिज्ञ अण्णासाहेब अंबाडे – पाटील म्हणाले की, दैनिक प्रभात हा एकमेव परिवार वकील मंडळींना उपयुक्त असलेली डायरी दरवर्षी देत असतो. ही डायरी वकील बांधवांच्या कामकाजात मोठी उपयुक्त ठरत आहे. याप्रसंगी नेवासा न्यायालयातील वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले तर आभार राजू इनामदार यांनी मानले.