India vs Afghanistan T20I Series (Mohali) :- नियमित कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली भारताच्या टी-२० संघात तब्बल १४ महिन्यांच्या खंडानंतर परतले आहेत. घरच्या मैदानावर रोहितच्या नेतृत्वाखालील संघ अफगाणिस्तानशी तिन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार असून यातील पहिला सामना आज (गुरुवार) मोहालीत होत आहे. या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवणार का या प्रश्नापेक्षा मोठा प्रश्न आहे तो रोहित व कोहली टी-20 क्रिकेटमध्ये इतक्या मोठ्या खंडानंतर कशी कामगिरी करतात.
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली गुरुवारी होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात वैयक्तिक कारणांमुळे खेळणार नाही. मात्र, 35 वर्षीय विराट कोहली IND vs AFG T20 मालिकेतील उर्वरित दोन सामने खेळण्यासाठी उपलब्ध असेल. बुधवारी प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी याला दुजोरा दिला आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतील पहिला टी-20 सामना 11 जानेवारीला मोहालीत, तर दुसरा सामना 14 जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे. 17 जानेवारी रोजी बेंगळुरूमध्ये तिसरा आणि अंतिम सामना होणार आहे.
#INDvAFG : रोहित-कोहलीच्या कामगिरीकडे लक्ष; भारताचा आज अफगाणिस्तानशी पहिला टी-20 सामना…
नोव्हेंबर 2022 मध्ये ICC पुरुष T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून भारताचा पराभव झाल्यानंतर कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी एकही T20 सामना खेळलेला नाही. 2023 मधील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि एकदिवसीय विश्वचषक पाहता दोन्ही खेळाडूंनी इतर क्रिकेट फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला होता.