Dunki Oscar Awards 2024 : 4 वर्षांनंतर पुनरागमन करत किंग खान म्हणजेच शाहरुख खानने यावर्षी सर्व मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. ‘पठाण’ आणि ‘जवान’ नंतर आता ‘डंकी’ची देखील चाहत्यांमध्ये क्रेझ होत आहे.
21 डिसेंबर 2023 रोजी शाहरुखचा ‘डंकी’ चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला आहे.
बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यासह प्रेक्षकांची मने जिंकण्यात हा सिनेमा यशस्वी ठरला असून, आता या ‘डंकी’बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. हा सिनेमाची ऑस्करसाठी एन्ट्री पाठवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
सिनेमातील भावनिक आणि विनोदी असलेली या सिनेमाची कथा प्रेक्षकांना भावली आहे. अवैध मार्गाने दुसऱ्या देशात जाणाऱ्या मुलाची गोष्ट ‘डंकी’ या सिनेमात दाखवण्यात आली आहे. 96 व्या ऑस्कर अवॉर्ड्समध्ये ‘डंकी’चे निर्माते अधिकृत एन्ट्री पाठवू शकतात. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.