मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर बनवलेले एक मीम्स सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. या मीम्सच्या माध्यमातून वाघ यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका करण्यात आली आहे. या मीम्सचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील विरोध केला आहे.
सामाजिक जीवनात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेबद्दल अशा प्रकारे समाजमाध्यमात केलेल्या टिपणीचे समर्थन करता येणार नाही मग ती महिला कुठल्याही पक्षाची असो त्याचा निषेधच केला पाहिजे.@MHD_Press@SakalMediaNews @lokmat @thodkyat @LoksattaLive pic.twitter.com/y7hEBAyPJY
— Rupalipatilthombare (@Rupalispeak) January 28, 2022
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी ट्विट केले आहे की,’सामाजिक जीवनात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेबद्दल अशा प्रकारे समाजमाध्यमात केलेल्या टिपणीचे समर्थन करता येणार नाही मग ती महिला कुठल्याही पक्षाची असो त्याचा निषेधच केला पाहिजे, असे पाटील ट्विटमध्ये म्हणाल्या. रुपाली पाटील यांच्या ट्विटनंतर त्यांचे सर्व स्तरावर कौतुक करण्यात येत आहे.’
दरम्यान, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने महाबिघाडी सरकार पुन्हा एकदा तोंडावर आपटलंय असं त्या ट्विट करून म्हणाल्या आहेत. महाबिघाडी सरकार किती असंविधानिक आणि खुनशी वागतंय हे स्पष्ट झालंय. हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या? फ्लॉवर नहीं फायर है… ! असा पुष्पा मधील डायलॉग घेऊन वाघ यांनी सरकारला टोला लगावला आहे यावर आता सोशलवर मीडियावर युजर्सद्वारे चित्रा वाघ यांना चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे.
चित्रा वाघ यांच्या, ‘BJP फ्लॉवर नहीं, फायर है’ वक्तव्याची सोशल मीडियावर खिल्ली; पहा व्हायरल मिम्स