हडपसर -दिल्लीतील महाराष्ट्र सदनमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवून अवमान केल्याप्रकरणी हडपसर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने येथील गांधी चौकात उड्डाणपुलाखाली मूक निषेध आंदोलन करण्यात आले.
आमदार चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात माजी नगरसेवक फारूख इनामदार, योगेश ससाणे, सुनील बनकर, डॉ. शंतनू जगदाळे, अमर तुपे, पूनम पाटील, जतिन कांबळे, संजय शिंदे, सागरराजे भोसले, अविनाश काळे, रवींद्र गोगावले, रूपेश तुपे, डॉ. लांडे पाटील, संदीप बधे, रामभाऊ कसबे, संजीवनी जाधव, शालिनी जगताप, शीतल शिंदे, वंदना मोडक, दीपाली कवडे, सविता मोरे, अश्विनी जगताप, अंजली लोटके, किरण गाडेकर, मीनाक्षी अहिरे, सविता घुले, बीना कटमणी, लालासाहेब खलाटे, विक्रम जाधव, पियूष मोहिते यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपाचे मंत्री, राज्यपाल यांनी महापुरुषांचा अपमान करण्याची शृंखला सुरू केली. यातच महाराष्ट्र सदन येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवून महापुरुषांचा अवमान करण्याची विकृत मनोवृत्ती जपली आहे. महापुरुषांचा केलेला अवमान राष्ट्रवादी कॉंग्रेस सहन करणार नाही. याविरोधात यापुढेही तीव्र आंदोलने केले जाईल.
– चेतन तुपे, आमदार, हडपसर विधानसभा