NCBची पुण्यात मोठी कारवाई! चिकू पठाणच्या साथीदाराच्या घरावर छापा; महत्वाचे पुरावे ‘हस्तगत’

पुणे –  अभिनेता सुशांत सिंग याच्या आत्महत्येच्या घटनेनंतर मुंबईमधील अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर नार्कोटीक्‍स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) पथकाने मुंबई पाठोपाठ शनिवारी पुण्यातही छापे टाकले.

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेकांना अंमली पदार्थ पुरविणाऱ्या चिंकू पठाण व आरीफ भोजवाल यांच्या पुण्यातील सहकाऱ्याच्या घरासह गोडाऊनवर “एनसीबी’ पथकाने छापे घातले. त्यामध्ये पठाणचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला, मात्र “एनसीबी’च्या पथकाने त्याच्याकडील अंमली पदार्थ तस्करीबाबतची महत्वाची माहिती गोळा केली आहे.

हडपसर, खडकवासला परिसरात कारवाई
चिंकू पठाण व आरीफ भोजवाल यांचा साथीदार राजु सोनावणे याचे खडकवासला येथील लांडगे वस्तीमधाये घर आहे. तसेच हडपसरमध्ये गोडाऊन आहे. “एनसीबी’च्या पथकाने त्याच्या घरासह गोडाऊनवरही “एनसीबी’च्या पथकाने छापा घातला.

चिंकू पठाण व आरीफ भोजवाल या दोघांना अटक केली, त्याचवेळी सोनावणे याला त्याची कुणकुण लागल्याने तो पळून गेला. मात्र “एनसीबी’च्या पथकाने त्याच्या घरात छापा घालून महत्वाचे पुरावे हाती घेतले आहेत. कर्नाटकमधून फळे, धान्याची वाहतुक करताना त्यातुन सोनावणे हा अंमली पदार्थ तस्करी करीत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.