चंदीगड – पाच राज्यांच्या निवडणुकांची तारीख जसजशी जवळ येत आहे तसे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. पंजाब येथील काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांची बहीण सुमन तूर यांनी आपल्या भावावर मालमत्तेत अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. संपत्ती ताब्यात घेण्यासाठी सिद्धू यांनी आपल्या आईला बेघर केले, असा आरोप सुमन तूर यांनी केला आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांची बहीण सुमन तूर अमेरिकेत राहतात. तूर म्हणाल्या, वडिलांच्या मृत्यूनंतर सिद्धू यांनी 1986 मध्ये त्यांच्या आईला घरातून हाकलून दिले होते. त्यानंतर 1989 मध्ये त्यांच्या आईचे दिल्ली रेल्वे स्थानकावर बेवारस स्थितीत निधन झाले.
#WATCH | Chandigarh: Punjab Congress chief Navjot Singh Sidhu's sister from the US, Suman Toor alleges that he abandoned their old-aged mother after the death of their father in 1986 & she later died as a destitute woman at Delhi railway station in 1989.
(Source: Suman Toor) pic.twitter.com/SveEP9YrsD
— ANI (@ANI) January 28, 2022
सुमन तूर म्हणाल्या की, जे कुटुंबाचे झाले नाही ते दुसऱ्याचे काय होणार. मालमत्तेसाठी सिद्धू यांनी स्वत:च्या आईवर अन्याय केला ते जनतेला काय न्याय देणार. दरम्यान, 20 फेब्रुवारी रोजी पंजाबमधील 117 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 10 मार्चला निवडणुकीचा लागणार आहे.