Navara Maza Navsacha । Navara Maza Navsacha 2 : अभिनेते सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर आणि अशोक सराफ यांचा 2004 मध्ये प्रदर्शित झालेला ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटासह त्यातील गाणी देखील प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस पडली होती. आजही या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळते. आता या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. । Navara Maza Navsacha
लवकरच ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा पार्ट 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, सिनेमाच्या शूटिंगला देखील सुरुवात झाली आहे. या संदर्भातील अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती देखील सचिन पिळगावकर हेच करणार आहेत.
सचिन यांनी दिग्दर्शित केलेला ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट 2004 साली प्रदर्शित झाला होता. आता 2024 साली त्याच्या दुसऱ्या भागाचं चित्रीकरण सुरू झालं आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ या सुपरहिट चित्रपटातील बसवर सचिन पिळगांवकर यांनी हजारो रुपये खर्च केले होते. अभिनेते जयवंत वाडकर यांनी याबद्दल नुकताच खुलासा केला आहे.
याबद्दल बोलताना अभिनेते जयवंत वाडकर सांगतात की, “नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील ती बस खरी तर होतीच… पण त्यावर सचिन यांनी 70 ते 75 हजार रुपये खर्च केले होते, असं जयवंत वाडकर यांनी सांगितलं. याशिवाय या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची जबाबदारी जयवंत वाडकर यांनीच सांभाळली होती.
दरम्यान, ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, जयवंत वाडकर अशोक सराफ, रीमा लागू, विजय पाटकर, कुलदीप पवार, सतिश तारे, प्रदीप पटवर्धन, अतुल परचुरे, आनंद अभ्यंकर, विकास समुद्रे, अली असगर, सुनिल तावडे, वैभव मांगले, मधुराणी गोखले, जॉनी लिव्हर आणि सोनू निगम हे कलाकार झळकले होते. । Navara Maza Navsacha । Navara Maza Navsacha 2