दक्षिणेची सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाने 2016 च्या “किरीक पार्टी’ या कन्नड चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केलेल्या पहिल्याच सिनेमातून तिने प्रेक्षकांना वेड लावले होते. ‘कार्ती’ सोबतचा “सुल्तान’ हा तिचा पहिला तमिळ चित्रपट याच वर्षी प्रदर्शित झाला.
त्याला प्रेक्षक आणि विश्लेषकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाली. रश्मिका मंदाना आता “मिशन मजनू’तून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामध्ये तिच्याबरोबर सिद्धार्थ मल्होत्रा लीड रोलमध्ये दिसणार आहे.
बॉलीवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ती “गुडबाय’मध्येही दिसणार आहे. तर अल्लू अर्जुनबरोबर “पुष्पा’मध्येही ती असेल. “पुष्पा’चा पहिला भाग यावर्षी ऑगस्टमध्ये तर दुसरा भाग पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.
एवढेच नाही तर तिला गुगलने नॅशनल क्रश घोषित केले आहे. इंस्टाग्रामवर जवळपास 18 दशलक्ष फॉलोअर्स असलेली ही अभिनेत्री केवळ दक्षिणेतच नव्हे तर उत्तर भागातही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते.
“नॅशनल क्रश’ बनल्यानंतर रश्मिका मंदानाने मोस्ट डिजायरेबल वुमनच किताब दुसऱ्यांदा पटकावला आहे. तिची क्रेझ इतकी वाढत चालली आहे की लवकरच ती इंटरनॅशनल क्रश बनेल, असा विश्वास वाटायला लागला आहे.