मुंबई – देशात करोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र करोनाचा धोका आणखी सुद्धा संपलेला नाही. करोनाच्या तिसऱ्या लाटेची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे. अशातच भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने पुढाकार घेत करोना महामारीसाठी त्याच्या ‘यु वी कॅन’ फाऊंडेशनच्या माध्यमातून मदतीची घोषणा केली आहे. यामधून १ हजार बेड्स मिळणार आहेत.
We've received a letter from Yuvraj Singh Foundation, stating that they're willing to provide infrastructure needed to set up 100-bedd critical COVID hospital. They've sought 20-30 days time. We've sent acceptance letter: Dr Sanjay Dixit, Dean, MGM Medical College, Indore (28.05) pic.twitter.com/osyj6pM7H3
— ANI (@ANI) May 29, 2021
या घोषण बाबत ‘यू वी कॅन’ने माहिती दिली असून भारतातील करोना रूग्णांची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या रूग्णालयात एक हजार अतिरिक्त बेडची व्यवस्था केली जाईल असल्याचे सांगितले आहे. वन डिजिटल एन्टरटेन्मेंटच्या सहकार्यातून हा उपक्रम सुरू केला जाईल असल्याचे सांगण्यात आले आहे.
Alone we are one drop, together we are an ocean.
Let’s become the ocean of support that can make a difference to someone’s life 🙏🏻#Mission1000Beds @youwecan @milaapdotorg #Milaap
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) June 2, 2021
यावेळी युवराज म्हणाला की, ”सर्वांनी आपले जवळचे लोक गमावले आहेत. ऑक्सिजन, आयसीयू बेड्स आणि इतर आवश्यक सुविधांसाठी असंख्य लोकांना झगडताना पाहिले आहे. यावरुन मी खूप प्रभावित झालो आणि मला वाटले की आपण आपल्या आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या लोकांना तसेच केंद्र व राज्य सरकारांना मदत करायला पुढे आलो पाहिजे” असे आवाहन सुद्धा युवराने केले आहे.
करोना महामारीच्या काळात याआधी सुद्धा अनेकांनी मदत केली आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सुद, विराट कोहली व त्याची पत्नी अनुष्का शर्मा, सचिन तेंडुलकर, पॅट कमिन्स, ब्रेट ली या खेळाडूंनीही करोना रुग्णांना मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देणगी दिली आहे. आता युवराजने सुद्धा मोठी मदत जाहिर केली आहे.