शिलाँग – जागतिक अजिंक्यपद आणि आशियाई खेळांसाठी निवडला न गेलेल्या जागतिक चॅम्पियनशिप (२०१९) रौप्यपदक विजेता अमित पंघलने (५१ किलो), राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्याने चंदीगडच्या अंशुल पुनियाचा ५-० असा पराभव केला.
पंघालची नजर आता फेब्रुवारीमध्ये होणा-या पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीवर आहे. यासाठी तो दीपक भोरिया यांच्याशी स्पर्धा करणार आहे. यावर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या दीपकला राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यापासून सूट देण्यात आली होती.
अमितसह सहा वेळा आशियाई चॅम्पियनशिप पदक विजेता शिव थापाने(६३.५ किलो) एकतर्फी वंशचा पराभव केला. याशिवाय सचिन सिवाच (५७ वजन गट), लक्ष्य चहर (८० वजन गट), २०२१ आशियाई चॅम्पियन संजीत (९२ किलो) यांनीही विजेतेपद पटकावले.
सचिन सिवाचने आरएसपीबीच्या सचिनचा ५-० असा पराभव केला, चाहरने हर्ष चौधरीचा तर संजीतने नवीन कुमारचा पराभव केला. मात्र, कॉमनवेल्थ गेम्स रौप्यपदक विजेता सागर अहलावत (९२+) याला पंजाबच्या जयपाल सिंगकडून पराभव पत्करावा लागला.
जयपाल तिसऱ्या फेरीत बाद झाला. दीपकने ७५ वजनी गटाच्या अंतिम फेरीत इश्मीतचा पराभव केला. साठ किलो वजनी गटात वरिंदर सिंगने आकाशचा पराभव केला.