Pakistan – पाकिस्तानातील काऊंटर टेरेरिझम डिपार्टमेंटने आज दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळून लावल्याचा दावा केला. गोपनीय माहितीच्या आधारे सीटीडीच्या पंजाब शाखेने पंजाब प्रांतात तब्बल १४७ ठिकाणी छापे घातले.
उधळलेल्या या कटाप्रकरणी १४ संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. अटक झालेले हे दहशतवादी तेहरिक ए तालिबान पाकिस्तान, इसिस आणि लष्कर ए झांगवी या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांचे सदस्य आहेत.
या दहशतवाद्यांकडून शस्त्रे, स्फोटके आणि अन्य गुन्हेगारी स्वरुपाचे साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे. गुरजनवाला, बहावरपूर, सहिवाल, फैसलाबाद, सरगोधा आणि लाहोर या ठिकाणी घातलेल्या छाप्यांदरम्यान या १४ संशयितांना अटक करण्यात आली, असे सीटीडीने म्हटले आहे.