मुंबई – मेट गाला 2022 हा फॅशनच्या सर्वात मोठ्या इव्हेंट 2 मे रोजी यूएस मध्ये आयोजित करण्यात आलाय. सर्व सेलेब्सने त्यांच्या फॅशन आणि बोल्ड अंदाजात या फॅशन इव्हेंटला हजेरी लावली. सर्व सेलेब्स एकापेक्षा जास्त आउटफिटमध्ये या इव्हेंटमध्ये दिसून आले.
View this post on Instagram
या इव्हेंटमध्ये जगभरातील प्रसिद्ध सेलिब्रिटी वेगवेगळ्या कपड्यांमध्ये पोहोचतात आणि ही या कार्यक्रमाची सर्वात खास गोष्ट आहे. वेगळे दिसण्याच्या स्पर्धेत लोक प्रत्येक प्रकारे फॅशनचे प्रयोग करतात.
View this post on Instagram
मेट गाला 2022 मध्ये रेड कार्पेट भारताचे प्रतिनिधित्व इंटरनेट सेंसेशन आणि बिझनेसवुमन नताशा पूनावालाने केले. यावेळी तिने रेड कार्पेटवर आपल्या हटके अंदाजाने सर्वांची मने जिंकली. सध्या सर्वीकडे तिच्या या हटके अंदाजाची चर्चा सुरु आहे.
View this post on Instagram
नताशाने ‘गिल्डेड ग्लॅमर’ थीमवर देसी तडका लावला. तिने भारतातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीद्वारे डिझाइन साडी यावेळी परिधान केली होती. नताशा पूनावालाचा हा पारंपरिक लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
भारतात कोविशील्ड लस उत्पादन करणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावालाची पत्नी नताशा पूनावाला आहे.
View this post on Instagram
नताशाचे सोशल मीडियावर एका अभिनेत्री इतकेच चाहते आहेत. नताशा पूनावालाचे जबरदस्त फॅशन सेन्सचे कौतुक करावे तितके कमी आहे. नताशा तिच्या स्टाईल स्टेटमेंटसह चाहत्यांना खूप प्रभावित करत आहे. नताशा नेहमीच एकापेक्षा एक ग्लॅमरस लूक कॅरी करतांना दिसून येते. नताशाकडे महागड्या गाड्या आहेत ज्यात रोल्स रॉयसपासून मर्सिडीज, ऑडीपर्यंतच्या नावांचा समावेश आहे.