#AUSvIND : हार्दिक पंड्याच्या ‘या’ कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक

पंड्याकडून नटराजनचा गौरव

सिडनी – कर्णधार विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतरही भारतीय संघाला मंगळवारी यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात 12 धावांनी पराभव पत्करावा लागला. या विजयासह यजमान संघाने सामना जिंकला तर, भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली.

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने दाखवलेल्या दिलदारपणाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत पहिल्या दोन सामन्यात अफलातून फलंदाजी केलेल्या पंड्याला मालिकेचा मानकरी पुरस्काराने गौरवण्यात आले.

मात्र, पंड्याने आपला हा पुरस्कार नवोदित वेगवान गोलंदाज टी. नटराजन याला सुपुर्द केला. नटराजनने संघात पदार्पण करताना बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध अत्यंत सरस व सातत्यपूर्ण गोलंदाजी केल्यामुळे मालिका विजय सोपा झाला. त्याच्या कामगिरीचा सन्मान करताना पंड्याने या विजयाचे श्रेयही नटराजनला दिले. पंड्याच्या कृतीचे प्रचंड कौतुक होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.