नसरुद्दीन शहा न्यूनोमिनयाच्या विकारामुळे रुग्णालयात दाखल

मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा यांना न्यूनोमिनयाच्या विकारामुळे आज रुग्णालयात दाखल करण्यात आले. 70 वर्षीय नसरुद्दीन यांच्यावर खारच्या हिंदुजा रुग्णालयात उपचार केले जात आहेत, असे त्यांच्या पत्नी रत्ना पाठक शहा यांनी सांगितले.

तेथे त्यांची प्रकृती नॉर्मल असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी नमूद केले. नसरुद्दीन शहा हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत कसबी अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत शंभरहून अधिक हिंदी चित्रपटात काम केले आहे.

अलीकडच्या काळात त्यांनी रंगभुमीवरील कार्यालाही महत्त्व दिले आहे, तसेच स्वतःची रंगभूमी निर्मिती करणारा एक ग्रुपही ते चालवत आहेत. गेल्या वर्षी त्यांनी ऍमेझॉन व्हिडिओ सिरीजमध्येही काम केले आहे. बंदीश बॅंडिट्‌स असे या सिरीजचे नाव आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.