Naseeruddin Shah : बॉलीवूड अभिनेते नसीरूद्दीन शाह अभिनयासह त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा ते बॉलीवूडवर निशाणा साधताना दिसतात. आता पुन्हा एकदा नसीरूद्दीन शाह त्यांच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. मात्र नसीरूद्दीन शाह यांचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.
सध्या सोशल मीडियावर नसीरुद्दीन शाह यांचा विमानतळावरील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ते विमानतळावर दिसताच त्यांच्या काही चाहत्यांनी सेल्फी काढण्यासाठी एकच गर्दी केली. व्हिडीओमध्ये नसीरुद्दीन शाह यांच्या चेहऱ्यावर मास्क आणि हातात पुस्तक पाहायला मिळत आहे. विमानतळावरून जात असताना त्यांच्याभोवती चाहत्यांची सेल्फीसाठी एकच गर्दी जमा होते. ती गर्दी पाहून त्यांनी चाहत्यांना सेल्फीसाठी नकार दिला आणि त्यांनी चाहत्यांवर संतापही व्यक्त केला. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये नसीरुद्दीन शाह ओरडत म्हणतात, “तुम्ही लोकांनी खूप चुकीचं काम केले आहे. तुम्ही डोकं फिरवण्याची कामं करतात, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? एखादा माणूस कुठे जात असेल तेव्हाही तुम्ही त्याला सोडत नाहीत. तुम्हाला का समजत नाही?”, असे नसीरुद्दीन चाहत्यांना चिडून म्हणाले. या व्हिडीओमुळे नसीरुद्दीन शाह चांगलेच ट्रोल होताना दिसत आहे. “ही खूप वाईट वागणूक आहे. आपल्याला प्रसिद्धी चाहत्यांमुळेच मिळत असल्याचे विसरू नका,” असे एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हंटले आहे.
दरम्यान, नसीरुद्दीन शाह लवकरच ‘शोटाइम’ मध्ये दिसणार आहेत. येत्या 8 मार्चला ही सिरिज ‘डिज्ने प्लस हॉटस्टार’या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.