Andhra Assembly Elections। देशातील लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आंध्र प्रदेशातही विधानसभा निवडणुकीचा जल्लोष सुरू आहे. अजून निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा निश्चित केल्या नसल्या तरी, यावेळी या निवडणुका मे महिन्यात होऊ शकतात. दरम्यान, राज्यातील राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी पूर्ण तयारी केलीय. जागांसाठीचे उमेदवारही निश्चित करण्यास सुरुवात केली आहे.
आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी टीडीपी आणि जनसेनेने उमेदवारांची यादी जाहीर केल्याचे समोर आलंय. या यादीत सुशिक्षित वर्गातील उमेदवारांची संख्या जास्त असल्याचे सांगण्यात येतंय.
हेही वाचा
चंद्राबाबू भाजपसोबत येण्याची औपचारिकता पूर्ण ! पवन कल्याण यांच्यासोबतही जागावाटप ठरल्याची चर्चा
उमेदवारांची पहिली यादी समोर Andhra Assembly Elections।
प्राप्त माहितीनुसार, तेलुगु देसम पार्टी-जनसेना पार्टी युतीने आज आंध्र प्रदेश निवडणुक 2024 साठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. TDP प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि जनसेना अध्यक्ष पवन कल्याण यांनी संयुक्तपणे उमेदवारांची यादी जाहीर केलीय. टीडीपीचे सुप्रीमो एन चंद्राबाबू नायडू कुप्पममधून निवडणूक लढवणार आहेत.
118 उमेदवारांच्या या यादीत, टीडीपीने 94 उमेदवार उभे केले आहेत, तर जनसेना 24 जागांवर निवडणूक लढवणार आहे, ज्याची घोषणा लवकरच केली जाईल. टीडीपीच्या यादीत 94 पैकी 23 नवीन चेहरे आहेत. या यादीमध्ये पदव्युत्तर पदवी असलेले 28 उमेदवार, पदवीधर पदवी असलेले 50 उमेदवार, 3 डॉक्टर, 2 पीएचडी आणि 1 आयएएस अधिकारी यांचा समावेश आहे.
24 जागांपैकी जेएसपीने 5 जागांची केली घोषणा Andhra Assembly Elections।
नेल्लीमारला – लोकम माधवी
अनकपल्ले – कोनाथला रामकृष्ण
राजानगरम – बटुला बलरामकृष्ण
काकिंडा ग्रामीण – पंथम नानाजी
तेनाली – नदेंडला मनोहर