Narendra Modi – देशात 2024 लोकसभा निवडणुकीत निकालाचे सर्व बॅरिअर्स आहेत, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी व्यक्त केला आहे. देशातील गरीब आणि वंचितांची प्रगती होऊ दिली नाही, असा आरोप करत त्यांनी नाव न घेता कॉंग्रेसवर केला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भ नरेंद्र मोदी म्हणाले, साधारणपणे ओपिनियन पोल निवडणुकी आधी येतात आणि सांगतात की, काय होणार आहे. पण तुमच्या थिममुळे स्पष्ट संकेत दिले आहे की, देशातील जनता ही सर्व बॅरिअर्स तोडून आमचे समर्थन करणार आहे.
2024च्या निवडणुकीचा निकाल हा “बियॉन्ड बॅरिअर्स’ असणार आहे. रिशेपिंग इंडियापासून ते बियॉन्ड बैरिअर्सपर्यंतच्या प्रवासात भारताचे भविष्य उज्वल करणार आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला देश ज्या वेगाने पुढे जाणे अपेक्षित होता. त्या वेगाने पुढे जाऊ शकला नाही. कारण लोकांच्या मानसिकतेमध्ये बैरिअर्स होते, अशी अप्रत्यक्ष टीका पंतप्रधानांनी कॉंग्रेसवर केली आहे.