Mary Millben – अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री मेरी मिलबेन ( Mary Millben) यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांचे निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयाबद्दल कौतुक केले. मोदी हे जगातले सर्वात लोकप्रिय आणि महान नेते आहेत, असे तिने म्हटले आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यामुळे जगभरातील माध्यमेही मोदींवर स्तुतीसुमने उधळत असल्याचे चित्र आहे. मेरी मिलबेन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की,
“आगामी लोकसभा निवडणुकीतही पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींना भारताची पहिली पसंती असेल. याशिवाय, अमेरिका-भारत संबंधांसाठी मोदी हेचसर्वोत्तम नेते आहेत.
यापूर्वी ७ सप्टेंबर रोजी मेरी मिलबेन यांनी जी२० मध्ये आफ्रिकन युनियनचा पूर्ण सदस्य म्हणून समावेश करण्याच्या प्रस्तावाबद्दल पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते.
भारताचे राष्ट्रगीत आणि भक्तिगीत ‘ओम जय जगदीश हरे’चे जागतिक पातळीवर सादरीकरण करत असलेली ४१ वर्षीय मेरी मिलबेन ही गायिका भारतातही लोकप्रिय आहे. जूनमध्ये मोदी यांच्या अमेरिका भेटीदरम्यान तिने भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ गायले होते.