मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. हा वाद पेटला असतानाच नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी ‘मी कोणताही गुन्हा केला नाही; माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही’ असं म्हणत आपली भूमिका मांडली आहे.
या प्रकरणी नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले त्यावर नारायण राणे म्हणाले,’कोण शिवसेना, समोर उभंतरी राहावं, नाशिक पोलीस आयुक्त काय राष्ट्रपती आहे की पंतप्रधान आहे आदेश काढायला. मी बोललो ते क्रिमिनल ऑफेन्स नाहीच. तपासून पाहावं. आमचं पण सरकार वर आहे, बघतो हे किती उड्या मारतात ते. असंही ते म्हणाले आहे.
दरम्यान, नारायण राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना चिपळूणमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. नारायण राणेंकडून अटक टाळण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेनेचे नाशिकमधील शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत अटकेचे आदेश दण्यात आले आहेत. दरम्यान महाडमध्येही नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण राणे Vs उद्धव ठाकरे संबंधित सर्व बातम्या –
‘मी कोणताही गुन्हा केला नाही; माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही’
“खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर या, तुमची औकात दाखवून देऊ”
शिवसेना ‘ऍक्शन मोड’मध्ये! तुफान दगडफेक करत नाशिकच्या भाजपा कार्यालयाची तोडफोड
नारायण राणे यांच्या अटकेसाठी पुणे पोलीस रवाना; मुख्यमंत्र्यांवरील टीका भोवणार
“नारायण राणे यांचे बाण वर्मी लागलेले दिसतायत”; भाजपच्या ‘या’ आमदाराचे राणेंना समर्थन
‘सिंहाच्या गुहेत प्रवेश करण्याची हिंमत करु नका. आम्ही वाट पाहत आहोत’
मुंबईत शिवसेना आक्रमक; नारायण राणेंविरोधात ‘कोंबडी चोर’ उल्लेख करत बॅनरबाजी
video – ‘…मी असतो तर कानाखालीच चढवली असती’, राणेंची जीभ घसरली