Infosys Shares: इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती (NR Narayana Murthy) यांनी त्यांचा चार महिन्यांचा नातू एकाग्र रोहन मूर्ती याला 240 कोटी रुपयांचे शेअर्स भेट दिले आहेत. अशा प्रकारे त्यांचा नातू देशातील सर्वात कमी वयाचा अब्जाधीश बनला आहे. एक्स्चेंज फाइलिंगवरून मिळालेल्या माहितीनुसार, एकाग्रला इन्फोसिसचे 15 लाख शेअर्स मिळाले आहेत, म्हणजेच त्याला कंपनीतील 0.04 शेअर्स मिळाले आहेत. या करारानंतर मूर्तींची इन्फोसिसमधील भागीदारी 0.40% वरून 0.36% पर्यंत कमी झाली आहे.
नोव्हेंबरमध्ये नारायण मूर्ती बनले आजोबा –
नोव्हेंबरमध्ये मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती आजी-आजोबा झाले. नारायण मूर्ती यांचा मुलगा रोहन मूर्ती आणि त्यांची सून अपर्णा कृष्णन यांना मुलगा झाला. नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती यांना दोन मुली आहेत. नारायणमूर्ती यांच्या नातवाचे नाव ‘एकाग्र’ आहे. हे नाव महाभारतातील अर्जुनपासून प्रेरित आहे.
1981 इन्फोसिस सुरुवात –
Infosys ची सुरुवात 1981 मध्ये $250 सह झाली आणि आज ती जगातील सर्वोत्तम कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीने कॉर्पोरेट गव्हर्नन्सला नवा आयाम दिला आणि उद्योजकतेला लोकशाही स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. सुधा मूर्ती यांनी इन्फोसिसच्या सुरुवातीला $250 चे योगदान दिले होते.
सुधा मूर्ती 25 वर्षांहून अधिक काळ इन्फोसिस फाउंडेशनच्या प्रमुख होत्या. डिसेंबर 2021 मध्ये त्या या पदावरून निवृत्त झाल्या. मात्र तरीही त्या समाजसेवेच्या कार्यात सक्रिय आहेत. अलीकडेच त्यांना राज्यसभा सदस्य म्हणून नामांकन करण्यात आली आहे.