Elvish Yadav | Snake Venom – बिग बॉसचा विजेता आणि प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादवला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नोएडा पोलिसांच्या पथकाने रविवारी एल्विश यादवला चौकशीसाठी बोलावले होते. ज्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आता बातमी अशी आहे की एल्विशने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे.
एल्विश यादवने सापाचे विष मागवल्याची कबुली दिली आहे. एल्विश इतर आरोपींच्या संपर्कात होता. दुसरीकडे, एल्विशच्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही. कारण नोएडामध्ये वकिलांचा संप सुरू आहे. ( Elvish Yadav | Snake Venom )
पोलिस तपासादरम्यान एल्विश यादवने काही लोकांच्या संपर्कात असल्याची कबुली दिली. पोलिसांनी एल्विशचे लोकेशन आणि सीडीआरही दाखवला. तसेच, चौकशीदरम्यान एल्विशनेही साप आणि विषाची बाब मान्य केली. एल्विश पोलिसांच्या प्रश्नात अडकला.
नोएडा पोलिसांनी 29 एनडीपीएस कायदा लागू केला आहे. या प्रकरणात आरोपीला किमान २० वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे. या कायद्यानुसार जामीन सहजासहजी मिळत नाही. फार्म हाऊसमध्ये झालेल्या पार्टीचे तपशीलही दाखवण्यात आले.
नोएडा पोलिसांच्या पथकाने रविवारी एल्विश यादवला चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. नोएडा पोलिसांच्या टीमने त्याला सूरजपूर कोर्टात हजर केले. सुनावणीनंतर एल्विशला ग्रेटर नोएडा जेलमध्ये पाठवण्यात आले. ( Elvish Yadav | Snake Venom )