मुंबई – शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटात केलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेवरून सध्या महाराष्ट्राचं सामाजिक-राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. अनेकांनी अमोल कोल्हेंच्या या भूमिकेवर आपले मत मांडण्यास सुरवात केली आहे.
अश्यातच आता सिनेसृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते ‘नाना पाटेकर’ यांनी सुद्धा ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटाचं समर्थन करत राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांना पाठिंबा दिला असल्याचे दिसून आले आहे.
नाना पाटेकर म्हणतात… मी सुद्धा ‘लास्ट व्हाईस रॉय माउंट बॅटन’ या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका केली आहे. अमोल कोल्हे यांनी केवळ अभिनय केला. अभिनय केल्याने नथुराम गोडसेच्या विचारांचं समर्थन केलं, असं होत नाही.’ असं नाना पाटेकर म्हणालेत.
तसेच, नाना पुढे म्हणतात… ‘तसंच कुणी कोणती भूमिका करावी हा त्यांचा वैयत्तिक प्रश्न आहे. यापेक्षा महत्वाचे विषय सध्या समाजात आहेत. त्यावर बोलणं गरजेचं आहे’ असं सुद्धा नाना पाटेकर म्हणतात.