मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाशी संबंधित अंमली पदार्थ रॅकेटची चौकशी एनसीबी अर्थात अंमली पदार्थविरोधी पथकातर्फे सुरु आहे. चौकशीदरम्यान एनसीबीच्या हाती ड्रग्ज रॅकेटमध्ये आणखी काही बॉलिवूडकर सामील असल्याबाबतचे पुरावे लागले आहेत.
याच मुद्यावरून काँग्रेसच्या नेत्या , अभिनेत्री नगमाने कंगनावर टीका केली आहे. तसेच एनसीबी एजन्सी बॉलिवूड अभिनेत्रींच्या प्रतिमेशी खेळत असल्याचा आरोप नगमा यांनी केला आहे.
Why has the NCB not summoned Kangana Ranaut who has admitted to have taken drugs . If they could summon other actresses on basis of what’s app chat ?? Hypocrite and is this the duty of NCB to leak out information to Press and malign the image of only female top actresses 56 inch pic.twitter.com/REWJLIYHNB
— Nagma (@nagma_morarji) September 23, 2020
नगमा म्हणाली,’कंगना ड्रग्जचं सेवन करत होती. याची कबूली तिने स्वत: दिली आहे. मात्र तरी देखील एनसीबीने अद्याप तिला समन्स बजावलेलं नाही. ज्या कलाकारांनी मोदी सरकार विरोधात आवाज उठवला त्यांनाच चौकशीसाठी बोलावलं जातंय. आता पुढचा नंबर स्वरा भास्कर, अनुभव सिंहा आणि रिचा चढ्ढा यांचा असेल.’अशा आशयाचं ट्विट करुन नगमाने एनसीबीच्या कारवाईवर संशय व्यक्त केला आहे.