स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; ६२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
नगर – विक्रीच्या उद्देशाने गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे बाळगणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरब्ंद केले आहे. त्यांच्याकडून ६२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे शाखल करण्यात आले आहे.
एम आयडीसी पोलीस ठाण्यात विकास सुधाकर सरोदे, ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ठकन उर्फ नितीन आल्हाट हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द नगर व पुणे, जिल्ह्यात दरोडा, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, जबरी चोरी, अवैध शस्त्रे बाळगणे, दुखापत असे गंभीर स्वरुपाचे ९ गुन्हे दाखल आहेत.
आगामी लोकसभेच्या अनुषगाणे जिल्ह्यात अवैधरित्या गावठी कट्टा बाळगणार्यावर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना विकास सरोदे (रा. राहुरी) हा व त्याचा साथीदारासह शेंडी बायपास ठिकाणी व ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट (रा. नेवासा) व त्याचा साथीदारासह नागरदेवळे गावचे शिवारात कापुरवाडी गावाकडे जाणारे रस्त्यावर गावठी कट्टे
विकण्यासाठी येणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीस सापळा रचून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
ही कारवाई हेमंत थोरात, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, रवींंद्र कर्डिले, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, संदीप चव्हाण, संतोष खैरे, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड संभाजी कोतकर, प्रमोद जाधव, अरुण मोरे यांच्या पथकाने ताब्यात घेतले.