nagar news : शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24च्या गळीत हंगामामध्ये उत्पादित झालेल्या 5 लाख 25 हजार 525 व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याच्या संचालिका स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे हस्ते संपन्न झाले.कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.
कारखान्याचा 2023-24चा ऊस गळीत हंगाम दि. 1 नोव्हेंबर रोजी सुरु झाला असून दि. 14 जानेवारी अखेर 5 लाख 93 हजार 309 मे. टन उसाचे गाळप होऊन 5 लाख 32 हजार 700 क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झालेले असून साखर उतारा आजचा 11.43 टक्के तसेच सरासरी बी-हेवीसह 10.61 टक्के आहे. सध्या प्रति दिवस 8,000 मे. टन याप्रमाणे उसाचे गाळप होत आहे.
या प्रसंगी कारखान्याचे संचालक लक्ष्मण शिंदे, सतीशराव शेंडगे-पाटील, नानासाहेब मुंडफणे, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, अमरदिप काळकुटे, सुभाष कटके, रामचंद्र ठवरे, तज्ञ संचालकड. प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत-पाटील, संचालिका सुजाता शिंदे, कार्यलक्षी संचालक रणजित रणनवरे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक पांडूरंग एकतपुरे,
बाळासाहेब माने-देशमुख, दत्तात्रय चव्हाण, विनायक केचे, राजेंद्र भोसले, अमृतराज माने-देशमुख, धनंजय सावंत, अनिल कोकाटे, श्रीकांत बोडके, हर्षाली निंबाळकर, तसेच कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले व खातेप्रमुख, सेक्रेटरी अभयराजे माने-देशमुख कामगार युनियन प्रतिनिधी नितीनराव बेनकर, रणजीत रणवरे व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सदर साखर पोती पुजन प्रसंगी कारखान्याच्या संचालिका मा. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे स्वागत चिफ केमिस्ट एस. एन. जाधव व सत्कार चिफ़ इंजिनिअर एस. के. गोडसे यांनी केला.
इथेनॉलसह वीजनिर्मिती
यंदा 14 जानेवारीअखेर वीज 4 कोटी 61 लाख 69 हजार 800 युनीट निर्माण झाली असून त्यामधुन वीजविक्री 2 कोटी 71 लाख 73 हजार 321 युनिट केलेली आहे. तसेच उपपदार्थ प्रकल्प डिस्टीलरीमध्ये बी-हेवी पासून 82 लाख 07 हजार 187 लिटर्स रेक्टीफाईड स्पिरीट तसेच 75 लाख 15 हजार 621 लिटर्स इथेनॉल उत्पादन झाले आहे.
अॅसेटीक अॅसिड प्लॅटमध्ये 259.500 मे. टन अॅसिटाल्डीहाइड व 287.800 मे. टन अॅसिटीक अॅसिडची निर्मिती झाली असलेची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली. शंकरनगर-अकलूज ः येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 5 लाख 25 हजार 525 व्या साखर पोत्याचे पूजन झाले.