पिंपरी – जिल्ह्यातून तडीपार केलेले असतानाही शहरात येऊन खून करण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारास पिस्तुलासह एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली. तर त्याचा मित्र पसार झाला. ही कारवाई रविवारी (दि. १४) रात्री साडेबाराच्या सुमारास मोशी येथील हवालदार वस्ती येथे करण्यात आली.
करणकुमार जाधव (वय २६, रा. लक्ष्मीनगर, मोशी) असे त्या तडीपार गुन्हेगाराचे आहे. तर राहुल (रा. खडी मशीन रोड, मोशी) असे त्याच्या मित्र आरोपीचे आहे. याबाबत पोलीस हवालदार अमोल दातार यांनी फिर्याद दिली.
आरोपी करणकुमार याला परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्तांनी पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून १७ फेब्रुवारी २०२२ पासून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. मात्र, तरी तो मित्रासह एका व्यक्तीला मारण्याच्या उद्देशाने मोशीत आला असता पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूस व रिक्षा जप्त करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक पानसरे करत आहेत.