जागेवरच प्रश्नांची सोडवणूक अन् समस्यांचा निपटारा
नेवासा – शिर्डी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांच्या निवासस्थानी जनतेचे प्रश्न झटपट मार्गी लागत असल्यामुळे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आपल्या समस्यांचा निपटरा करण्यासाठी दरबारात येत आहे. नेवाशापासून तर थेट अकोले पर्यंतचे कार्यकर्ते खासदार लोखंडे यांच्या कार्यालयात आपल्या समस्या सोडविण्यासाठी मोठी गर्दी करत आहे. कामानिमित्त आलेल्या सर्वांच्याच प्रश्नांची सोडवणूक होवून कामे झटपट मार्गी लागत असल्यामुळे जनतेतून खासदार लोखंडे यांच्या कामाचे कौतुक होताना दिसत आहे.
खासदार लोखंडे हे त्यांच्या दरबारात आलेल्या कार्यकर्त्यांचा पक्ष न पाहता त्यांची समस्या किती महत्वाची आहे हे समजून प्रश्नांची सोडवणूक करत आहे. खासदार लोखंडे यांच्यावर असलेला जनतेचा विश्वास सार्थकी लागत असल्याचे नेवासा तालुका शिवसेना प्रमुख सुरेशराव डिके यांनी सांगितले.
लोकसभा निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येवून ठेपलेली असताना खासदार लोखंडे हे पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जावून कार्यालयात आलेल्या जनतेने सांगितलेल्या कामाची समस्या किती महत्वाची आहे, हे समजावून घेवून त्याची सोडवणूक करत असल्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्ते लोखंडे यांच्या कार्यालयात गर्दी करत आहे मतदार संघात “आपला माणूस आपल्यासाठी’ असल्याचे लोखंडे यांच्या कामाबाबात जनतेतून बोलले जात आहे.
शिवसेना पक्षात तरुणांचा प्रवेश
खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीमध्ये अनेक तरुणांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना नेतृत्व व खासदार लोखंडे यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे अनेक कार्यकर्ते शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत असून शिवसेनेचा किल्ला मजबूत होत असल्याचे यावेळी दिसून आले.