शिर्डी – शिर्डी येथे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषण अधिक तीव्र करण्यासाठी रविवारी सायंकाळी शिर्डीत सकल मराठा समाजातर्फे कॅण्डल मार्च काढत सोमवारपासून आमरण उपोषण बसण्याचा निर्णय घेतला.
जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण बसण्याचा निर्णय घेतल्याने शुक्रवारी सचिन चौगुले, ताराचंद कोते, विजय काळे, अनिल बोठे, वीरेश बोठे, मुन्ना सदाफळ, तसेच राहाता तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे शुक्रवारपासून साखळी उपोषणस बसण्याचा निर्णय घेतला. हे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी रविवारी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांनी शिर्डीत कॅण्डल मार्चचे आयोजन केले. सोमवारपासून सचिन चौगुले, अनिल बोठे, नितीन कोते, विकास गोंदकर, प्रकाश गोंदकर आदी समाज बांधवांनी आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे.
रविवारी सायंकाळी कॅन्डल मार्च मोर्चात महिला तसेच युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला. रविवारी साखळी उपोषणाच्या चौथ्या दिवशी नानासाहेब बोठे, नितीनराव कापसे, अभय शेळके, दशरथ गव्हाणे, शफीक शेख, कनिफ गुंजाळ, चंद्रशेखर कार्ले, संग्राम कोते, फकीरा लोढा, सुनील बोठे, नवनाथ मुजमुले, सचिन शिंदे, चंद्रभान धनवटे, व विविध गावांतील नागरिकांनी भेट देऊन या उपोषणास पाठिंबा दिला.
रविवारी सायंकाळी काढण्यात आलेल्या कॅण्डल मार्च मोर्चात माजी नगराध्यक्षा अनिताताई जगताप, कविताताई कोते, आरती चौगुले, स्वाती गोंदकर, पंकजा गोंदकर, सुजात आठरे, साक्षी भागवत, श्रद्धा जरांगे तसेच साई निर्माण अकॅडमीच्या तीस विद्यार्थिनी व विद्यार्थी व सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्यातील ज्या कुणाला जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा द्यायचा असेल त्यांनी शिर्डी येथे सुरू असलेल्या उपोषणास बसून पाठिंबा द्यावा. तालुक्यात इतर ठिकाणी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेऊ नये, जेणेकरून समाजात दुफळी निर्माण होणार नाही, असे कोणी करत असाल तर समाजाचा रोषाला त्या व्यक्तीवर राहील.
सचिन चौघुले, शिर्डी.