नगर – नगर शहरासह श्रीरामपूर परिसरात चैन स्नॅचिंग करणार्या दोघा सराईतांकडून तब्बाल २२.३ (२२२ ग्राॅम) तोळे असा १५ लाख ७ हजारांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत करण्यात आला आहे. सराईत आरोपींवर नगर, श्रीरामपूर पोलीस ठाण्यात तब्बल १२ गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
गणेश विठ्ठल आव्हाड (वय २४, रा. गजानन कॉलनी, नवनागापुर, नगर), सागर रमेश नागपुरे (वय 30 रा. सावतानगर, भिंगार, नगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा आव्हाड याने त्याच्या साथीदारांसह केला असून तो सध्या भिस्तबाग परिसरात दुचाकीवर फिरत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानुसार पो.नि. आहेर यांनी लागलिच पथकाने मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात असलेले सोन्याचे दागिने व एक दुचाकी ताब्यात घेतली. त्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारासह हा गुन्हा केला असल्याचे सांगितले. तसेच त्याच्यावर कोतवाली, तोफखाना, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात १२ गुन्हे दाखल असल्याचे तपासात पुढे आले आहे. तर सागर नागपुरे यावर एमआयडीसी पोलीस ठाणे, नेवासा, तोफखाना अशा विविध पोलीस ठाण्यात १० गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेतील सोपान गोरे, संदीप पवार, मनोहर गोसावी, रवींद्र कर्डिले, देवेंद्र शेलार, विशाल गवांदे, संतोष खैरे, फुरकान शेख, शिवाजी ढाकणे, रणजित जाधव, आकाश काळे, अमृत आढाव व मेघराज कोल्हे यांच्या पथकाने कारवाई केली.