नगरच्या सुरक्षिततेसाठी माझीच गरज

डॉ. सुजय विखे : माझ्या पराभवासाठी पवार शेवगावात

शेवगाव – आज जो खासदार होईल, तो आपल्या तरुणाचा नेता व आदर्श होणार आहे. पक्षाची अडचण असलेल्यांनी अधिक विचार न करता स्वतःला एकच प्रश्‍न विचारा आपल्या घरातील मुले मोठी झाल्यानंतर कोणासारखे झाली पाहिजेत? तुम्ही ठराविक लोकांच ऐकून जर चुकीचं बटन दाबलं तर पुढची पंचवीस वर्षांची पिढी तुम्हाला माफ करणार नाही. देश सुरक्षित ठेवण्यासाठी जशी नरेंद्र मोदींची गरज आहे, तशी अहमदनगर सुरक्षित करण्यासाठी डॉ. सुजय विखेंची गरज लागणार आहे, हा विचार तुम्ही करा. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व नगरच्या विकासासाठी उच्च शिक्षित तरुणाला संधी द्या, असे आवाहन भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.

डॉ.विखे यांनी तालुक्‍याचा झंझावाती दौरा केला. दहिगावने जिल्हा परिषद गटासह ठिकठिकाणी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. मोनिका राजळे, भाजप तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, ताराचंद लोढे, माजी जिल्हा सरचिटणीस वाय. डी. कोल्हे, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, नगरसेवक अरुण मुंडे, सागर फडके, दहिगावने गटप्रमुख उदय शिंदे, गुरुनाथ माळवदे, डॉ.अरुण पवार, लक्ष्मण काशीद, आसाराम नऱ्हे, बशीर पठाण, विकास थोरात, सुहास चव्हाण, कल्याण जगदाळे, जिजासाहेब घुले आदींसह नागरिक उपस्थित होते.

डॉ. विखे म्हणाले, देशाचे पंतप्रधान व्हायचे ते शेवगावात येऊन सभा घेत आहेत. का तर छत्तीस वर्षाच्या मुलाला पाडण्यासाठी, असा टोला डॉ. विखे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता लगावला. मला पडायचं का, तर हा मुलगा जर खासदार झाला तर या ठिकाणी एव्हढा विकास होईल, की यापुढे खोटं बोलायला कोणत्याच नेत्याला संधी राहणार नाही. म्हणून आपले डोळे उघडा आणि अशा पक्षाचे धुणं धुणे आता बंद करा. वैचारिक पातळीवर उमेदवारांची तुलना करा आणि निर्णय घ्या. खऱ्या अर्थाने पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्याची ही निवडणूक ठरणार आहे. शेवगाव तालुक्‍यातील मठाचीवाडी, रांजणी, दहिगाव ने, भाविनिमगाव, ढोरसडे- अंत्रे आदी भागातील मतदारांशी विखे यांनी संवाद साधला. यावेळी आ. राजळे यांच्यासह कार्यकर्त्यांची भाषणे झाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.