पुणे – लाेणीकाळभाेर परिसरात मंतरवाडी येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील पतीने २६ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह साडीत गुंडाळून ताे खांद्यावर घेऊन जात कात्रज बायपासजवळ माेकळ्या जागेत फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विद्या राहूल फडतरे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी पाेलीसांनी मयताचा पती राहूल ज्ञानाेबा फडतरे (वय-३२) याला अटक केली अाहे. त्याच्या विराेधात सासरे दत्तात्र्य कृष्णा शेडगे (वय-५०,रा.परिचेता,ता.पुरंदर, पुणे) यांनी पाेलीसांकडे फिर्याद दिली आहे. राहूल फडतरे हा वाहन चालक म्हणून काम करत असून त्याचे सात वर्षापूर्वी विद्या साेबत लग्न झाले. त्यांना तीन वर्षाचा मुलगा देखील आहे. मात्र, राहुल हा विद्या हिच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेऊन तिच्याशी वाद घालत हाेता.
कात्रज-बायपास रस्त्यावर मंतरवाडी येथील माेकळया जागेत हडपसर पाेलीसांना एका साडीत गुंडाळलेला महिलेचा मृतदेह मिळून आला हाेता. पाेलीसांनी तिची ओळख पटवून त्याबाबत राहुल याच्याकडे चाैकशी केली. त्यावेळी त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. २१ मार्च राेजी रात्री साडेबारा वाजण्याचे सुमारास पती-पत्नी घरात असताना, राहुल याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा दाबून खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह साडीत गुंडाळून घराजवळील माेकळया प्लाॅट मध्ये फेकून दिल्याचे सांगितले आहे. याबाबत सहाय्यक पाेलीस निरीक्षक दिगंबर बिडवे पुढील तपास करत आहे.