पुणे – आईने दुसरे लग्न केल्यानंतर सावत्र पित्यासाेबत राहत असलेल्या १६ वर्षीय मुलीला घरात एकटी असल्याचे पाहून सावत्र पित्याने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय आराेपीवर येरवडा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पिडित मुलीने पाेलीसांकडे तक्रार दिली आहे. सदर आराेपी सावत्र पिता हा मुळचा आसाम राज्यातील सलिचर येथील रहिवासी आहे. पुण्यातील येरवडा परिसरात ताे दुसऱ्या लग्नाची पत्नी व तिच्या मुलीसाेबत राहत हाेता. सन २०१६ पासून पिडित मुलगी घरी एकटी असताना वेळाेवेळी तिला सावत्र पित्याने तिच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी देवून जबरदस्तीने तिच्याशी जवळीक साधत तिचा लैंगिक छळ केला. मात्र, सततच्या वडीलांच्या त्रासाला कंटाळून मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितल्यानंतर याबाबत पाेलीसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास येरवडा पाेलीस करत आहे.
खाऊचे अमिषाने चिमुरडीचा विनयभंग
काेथरुड परिसरातील एका साेसायटीत राहणाऱ्या सात वर्षाच्या चिमुरडीस संबंधित इमारतीत राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणाने खाऊ देण्याचे अमिष दाखवले. त्याने मुलीस जवळ बाेलवुन तिला चाॅकलेट देताे, बिस्कीट देताे असे बाेलुन त्याने तिच्या शरीराला वाईट हेतुने स्पर्श करुन तिचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी पाेलीसांनी मणि रामा मध्येशिया (वय-१९,रा.देवरीया, उत्तरप्रदेश) या आराेपीला अटक केली आहे. मेट्राे मध्ये ताे मजूराचे काम करत असून मुळचा उत्तरप्रदेशचा रहिवासी आहे.