राहुरी -पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच तिचा गळा दाबून खून केला. तसेच नातेवाईकांना पत्नीचा करोनाने मृत्यू झाल्याचा बनाव रचला. मात्र हा बनाव मृतदेहाच्या उत्तरीय तपासनीनंतर उघड झाला. राहुरी पोलिसांनी आरोपीस अटक केली असून, महिलेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अनिता सोमनाथ इंगवले (वय 26) ही विवाहिता पती व दोन लहान मुलांसह राहुरी शहरातील तनपुरेवाडी येथे राहात होती. विवाहानंतर काही दिवसांतच पती सोमनाथ लक्ष्मण इंगवले पत्नी अनिता हिच्या चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ व मारहाण करत होता. त्याच कारणावरून त्यांच्यात नेहमी भांडणे होत असे. याबाबत मयत अनिता हिने माहेरच्या लोकांना तशी माहिती दिली होती.
आज पहाटे साडेपाच वाजेदरम्यान आरोपी सोमनाथ इंगवले याने पत्नी अनिता हिचा गळा दाबून खून केला.
त्यानंतर तिच्या माहेरच्या लोकांना अनिताची प्रकृती मागील एक-दोन दिवसांपासून बरी नव्हती. तिला ताप व खोकला येत होता. आम्ही तिच्यावर घरी उपचार केले होते. परंतु तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. आज सकाळी तिचा मृत्यू झाला, असे सांगितले. घटनेची माहिती मिळताच माहेरच्या नातेवाईकांनी नगर येथील जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी मयत अनिता हिच्या गळ्याच्या मध्यभागी पान 2 वर…
काळसर व लालसर खुणा दिसून आल्या. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीतही गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे सोमनाथ इंगवले याचा बनाव उघड झाला. त्यानंतर पोलिसांनी इंगवले यास ताब्यात घेतले.
मयत अनिताचे वडील योसेफ शहादू काळे (रा. देवगाव, ता. नेवासे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात आरोपी सोमनाथ इंगवले याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बागूल हे करीत आहेत.