entertainment news – डॉ. अस्थाना ते सर्किटपर्यंत… या सर्व नावांचा उल्लेख केल्यावर फक्त ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ या चित्रपटाचे नावच लोकांच्या मनात येते. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने संजय दत्तची ढासळणारी कारकीर्द पुन्हा रुळावर आणली. यासोबतच राजकुमार हिरानी यांनी बॉलिवूडला अशी जोडी दिली, ज्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते आजही उत्सुक आहे.
ही जोडी होती मुन्ना भाई – सर्किटची… संजय दत्त – अर्शद वारसीची ही पात्रे 2003 तसेच 2006 मध्ये आलेल्या ‘मुन्ना भाई’ मालिकेतील जीव होते. आता एका व्हिडिओने पुन्हा एकदा ‘मुन्ना भाई 3’ बनवण्याच्या अफवांना उधाण आले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणार मुन्ना भाई – सर्किटचा व्हिडिओ
Munna Bhai 3 : मुन्ना भाई आणि सर्किटची जोडी पुन्हा दिसणार एकत्र #Munnabhai3 pic.twitter.com/wHmivzR3pa
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) September 15, 2023
2006 मध्ये ‘लगे रहो मुन्ना भाई’ रिलीज झाला तेव्हापासून सर्वांनाच संजय दत्त – अर्शद वारसीला पुन्हा मुन्ना भाई – सर्किटच्या भूमिकेत पाहायचे होते. या दोघांना पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते इतके आतुर आहेत की जेव्हाही त्यांना संधी मिळते तेव्हा ते ‘मुन्ना भाई 3’ची सोशलवर मागणी करू लागतात.
संजय दत्त – अर्शद वारसी यांनी त्यांच्या पात्रांनी निर्माण केलेली क्रेझ लक्षात घेता, ‘मुन्ना भाई एमबीबीएस 3’ मध्ये त्यांना एकत्र पाहण्याची चाहत्यांना आशा आहे. अशातच व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राजकुमार हिरानी सोबत संजय दत्त – अर्शद वारसी दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये संजय दत्त – अर्शद वारसी राजकुमार हिरानी सोबत गप्पा मारताना दिसत आहेत. संजू बाबा त्याच्या मुन्नाभाई अवतारात चमकदार केशरी शर्ट घातलेला दिसत आहे, तर अर्शद वारसी देखील सर्किट गेटअपमध्ये दिसत आहे. सेटवर संजुबाबासोबत राजकुमार हिरानी ही दिसत आहे.
व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर मुन्नाभाईचा टायटल ट्रॅक वाजत आहे. ‘आह, मुन्ना वापस आ गया है!’ व्हिडिओमध्ये, राजकुमार हिरानी असे म्हणताना ऐकू येते. या व्हायरल व्हिडिओनंतर चाहत्यांना आशा आहे की लवकरच आपल्याला ‘मुन्ना भाई 3’ रुपेरी पडद्यावर पहायला मिळेल.