taarak mehta ka ooltah chashmah : लोकप्रिय कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ अनेक वर्षांपासून टीव्हीवर राज्य करत आहे. मग ते जेठालाल, दया बेन किंवा बबिता जी.! या सर्व पात्रांनी चाहत्यांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. दरम्यान, शोमध्ये ‘बबिता जी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ताबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे.
अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, 36 वर्षीय मुनमुन दत्ताने 27 वर्षीय राज अनडकटसोबत ( टप्पू ) एंगेजमेंट केली आहे. मुनमुन आणि राज यांच्या अफेअरच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून समोर येत होत्या.
जेव्हा राजने टप्पूच्या रुपात शोमध्ये प्रवेश केला तेव्हा हा सिलसिला सुरू झाला. आधी ते दोघे भेटले आणि नंतर त्यांची मैत्री झाली. यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर ते एकमेकांना डेट करू लागले.
सध्या मुनमुन दत्ता आणि राज यांच्या एंगेजमेंटची बातमी सगळीकडे चांगलीच व्हायरल होत आहे. वास्तविक, कलाकारांच्या जवळच्या व्यक्तीने त्यांच्या एंगेजमेंटच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण चाहते अजूनही दोघांच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत. हे एंगेजमेंट मुंबईबाहेर म्हणजेच वडोदरात झाल्याचं मीडिया रिपोटर्स सांगत आहे.
‘बबिता जी’ आणि ‘टप्पू’ची झाली एंगेजमेंट ! munmun dutta | raj anadkat
कुटुंबियांच्या उपस्थितीत मुनमुन दत्ता आणि राज अनाडकट यांनी लग्नगाठ बांधली. दोघांच्याही कुटुंबीयांना नात्यात कोणतीही अडचण नाही, ते खूप आनंदी आहेत. वास्तविक राज मुनमुन दत्तापेक्षा 9 वर्षांनी लहान आहे. मात्र, आता दोघांनीही एंगेज करून त्यांच्या नात्याला नवीन नाव दिले आहे. रिपोर्ट्समधून समोर आले आहे की शोमध्येही सर्वांना त्यांच्या नात्याबद्दल माहिती होती.
मुनमुन दत्ता गेल्या 15 वर्षांपासून या शोशी जोडली गेली आहे. यामध्ये ती बबिता जीची भूमिका साकारताना दिसत आहे. दुसरीकडे राज अनडकट टप्पूच्या भूमिकेत होता. पण त्याने फार पूर्वीच या शोचा निरोप घेतला आहे. त्यावेळी अभिनेत्याच्या या निर्णयामुळे चाहते चांगलेच संतापले होते. पण अनेक बातम्यांनुसार त्याला शोमधून काढून टाकण्यात आले आहे.
वास्तविक, शोमध्ये जेठालाल आणि बबिता जी यांच्यातील प्रेमाने भरलेली धमाल चाहत्यांना आवडते. या बातमीनंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स बनवले जात आहेत. याबाबत यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. मुनमुन दत्ताबद्दल बोलायचे झाले तर अभिनयासोबतच ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. । munmun dutta | raj anadkat