WPL Live Cricket Score, DC vs GG Women’s Premier League 2024 : महिला प्रीमियर लीग 2024 चा शेवटचा साखळी सामना आज खेळवला जाणार आहे. गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणारा हा सामना मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील संघासाठी महत्त्वाचा आहे.
जर दिल्लीने हा सामना जिंकला तर ते थेट फायनलमध्ये धडक मारतील. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सात सामन्यांपैकी दिल्लीने पाच जिंकले आहेत, तर दोन गमावले आहेत. त्याचबरोबर गुजरात जायंट्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे.
तत्पूर्वी, गुजरातने दिल्लीविरुद्ध टाॅस जिंकला आहे. कर्णधार बेथ मूनीने नाणेफेक जिंकून दिल्लीविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी कर्णधार बेथ मूनी म्हणाली की, तिचा संघ कोणताही बदल न करता या महत्त्वाच्या सामन्यात दाखल झाला आहे. त्याचबरोबर मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील संघात एक बदल करण्यात आला आहे. तितस साधूच्या जागी मिन्नू मणीला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाले आहे.
DC vs GG : दोन्ही संघाची Playing 11 पुढीलप्रमाणे….
दिल्ली कॅपिटल्स : मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, एलिस कॅप्सी, मारिझान कॅप, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, राधा यादव, तानिया भाटिया (विकेटकीपर), मिन्नू मणी.
Playing XI’s are in 💪
Live 💻📱https://t.co/qXiPrN1UKL #TATAWPL | #DCvGG pic.twitter.com/60Zq7rEIcv
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 13, 2024
गुजरात जायंट्स : लॉरा वोल्वार्ड, बेथ मूनी (c&wk), डेलन हेमलता, फोबी लिचफिल्ड, ऍशले गार्डनर, भारती फुलमाली, कॅथरीन ब्राइस, तनुजा कंवर, शबनम शकील, मेघना सिंग, मन्नत कश्यप..
प्लेऑफच्या शर्यतीतून दोन संघ बाहेर..
महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रात दोन संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. यामध्ये यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्सचा समावेश आहे. दोघेही गुणतालिकेत अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.