फुरसुंगी – पत्रिकेतील नावासाठी आणि घराजवळ नावाच्या पाटीसाठी नव्हे तर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुणे मनपाची निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिपादन हांडेवाडी-औताडेवाडी गावचे माजी सरपंच संजय जाधव यांनी केले.
संजय जाधव यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ५८१ गरजू कुटुंबांना मोफत गॅस टाकी, 151 कुटुंबाना मोफत गॅस शेगडी वाटप आणि सर्वपक्षीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार संजय जगताप, आमदार चेतन तुपे पाटील यांच्या सौभाग्यवती सोनल चेतन तुपे पाटील, सासवसडचे नगर उपाध्यक्ष संजय जगताप, जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरुंगे, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष निवृत्ती बांदल, नगरसेवक आनंद अलकुंटे, पंचायत समिती उपसभापती दिनकर हरपळे, राहुल चोरघडे, भरत झाम्बरे, दत्ता गायकवाड, लक्ष्मण बांदल, प्रज्ञा झाम्बरे, संजय हरपले, गोविंद हांडे, विलास शेवाळे, बबनराव बांदल, सागर भोसले, दीपाली कवडे, महेंद्र शेवाळे, हिम्मत हांडे, दत्तोबा बांदल, राकेश झाम्बरे, नानासाहेब औताडे, सचिन निंबाळकर, जितेंद्र तिवारी, गुलाब जगताप, सागर जगताप, दादा झाम्बरे, हनुमंत जाधव, बाळासाहेब हांडे, श्रीकांत औताडे, सोमनाथ सुर्वे, पप्पू बहिरट, रामदास न्हावले, स्वप्नील हांडे, बापू औताडे, सेना नेते शाश्वत घुले, सागर होले, सुभाष बापू थिटे, दिलीप औताडे, दादा औताडे , दिलीप जगताप, सचिन हांडे, पंपू हांडे, विकास हांडे, श्रीकांत औताडे, आनंद औताडे, बिपीन औताडे, रामदास हांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवक काँग्रेसचे हवेली अध्यक्ष सूरज शेवाळे यांनी केले. यावेळी सर्वपक्षीय मान्यवरांनी संजय जाधव यांच्या या उपक्रमाचे स्वागत करत त्यांच्या पाठीशी जनता असल्याने पुणे मनपा निवडणुकीत ते बाजी मारतील असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तेजेस हांडे, बंडू हांडे, स्वप्निल जाधव,चेतन जाधव,ज्ञानेश्वर आदेश हांडे, दिपक हांडे, शुभम हांडे,सुधीर जाधव, राहुल हांडे, चंद्रकांत झांबरे,दत्ता होळकर यांनी कार्यक्रम परिश्रम घेतले.