नवीदिल्ली – राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा सध्या जोरदार पद्धतीने सुरु आहे. यात्रेला संमिश्र असा प्रतिसाद असला तरी सोशल मीडियावर या यात्रेची जोरदार चर्चा आहे. भाजपकडून मात्र राहुल गांधींसह या यात्रेवर जोरदार टीका सुरु आहे. यासाठी भाजपच्या अधिकृत पेजवरून एक कार्टून व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. ज्यात शोलेमधील असराणीच्या वेषभूषेप्रमाणे राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर निघाल्याचे पाहायला मिळते.
व्हिडिओच्या माध्यमातून भाजप काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या ‘भारत जोडो यात्रे’ची खिल्ली उडवत आहे. व्हिडिओमध्ये गोव्यातील काँग्रेस नेत्यांचे सोडून जाणे, गुलाम नबी आझाद यांचा राजीनामा, राजस्थान बंड देखील दाखवण्यात आले आहे. व्हिडिओच्या शेवटी सोनिया गांधी देखील राहुल गांधींसोबत आल्याच्या दिसतात. व्हिडिओ शेअर करत भाजपने लिहिले की, ‘मम्मी ये दुःख खतम काहे नहीं होता है ?’ खतम…टाटा…गुडबाय !
मम्मी ये दुःख खतम काहे नहीं होता है?
खतम…टाटा…गुडबाय! pic.twitter.com/J4tFqQgPOQ
— BJP (@BJP4India) October 16, 2022
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज ३९ वा दिवस आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या यात्रेने एक हजार किलोमीटरचे अंतर पूर्ण केले आहे. सध्या कर्नाटकात सुरू असलेल्या या यात्रेला सर्वसामान्यांचा भरगोस पाठींबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. हळकुंडी मठापासून सुरू झालेला प्रवास आता बेल्लारीकडे रवाना झाली आहे.