मुंबई – महाविकास आघाडीचा आज मुंबईत महामोर्चा काढला जाणार असून त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आमदार-खासदारांकडून शिवाजी महाराजांविषयीची वादग्रस्त वक्तव्य, राज्यपालांची विधानं आणि राज्यातून बाहेर जाणारे उद्योग या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. आणि या मोर्चातून सरकारचा निषेध केला जाणार आहे. सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात झाली असून, भायखळा ते आझाद मैदान असा महामोर्चाचा मार्ग असणार आहे.
दरम्यान, याच अनुषंगाने मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल सुद्धा करण्यात आले आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती मुंबई वाहतूक शाखेने दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक ट्विट शेअर करत वाहतुकीतील बदल सांगितले आहेत. हे बदल सायंकाळपर्यंत असणार आहे.
दिनांक १७/१२/२०२२ रोजी महाविकास आघाडी पक्षाने मोर्चा आयोजित केला आहे. यास्तव सकाळी १०:०० वा. ते सायंकाळी मोर्चा समाप्ती पर्यंत वाहतूक व्यवस्थेचे खालील प्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.#MTPTrafficUpdates pic.twitter.com/Rm6vAIMrvd
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) December 16, 2022
हा मार्ग वाहतुकीसाठी बंद :
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रिचर्डसन्स क्रूडास मिल, सर जे.जे. उड्डाणपूल, डॉ. दादाभाई नवरोजी रोड,, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-टाईम्स ऑफ इंडिया हे मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहेत.
या पर्यायी मार्गांचा करा वापर :
– गॅस कंपनी-चिंचपोकळी पूल- आर्थर रोड- सात रास्ता सर्कल- मुंबई सेंट्रल- लॅमिंग्टनरोड- ऑपेरा हाउस-महर्षी कर्वे रोड
– वाहन चालकांना सात रस्ता सर्कल- मुंबई सेंट्रल- तारदेव सर्कल- नाना चौक- एन.एस. पुरंदरे रोड मार्गाचा वापर करता येईल
भायखळ्याहून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी पुढील मार्गाचा वापर करावा :
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग- खडा पारसी- नागपाडा जंक्शन- दो टाकी- जे.जे. जंक्शन मोहम्मद अली रोड
– नागपाडा जंक्शन- मुंबई सेंट्रल-नाना चौक-एन. एस. पुरंदरे रोड
– सीएसएमटी स्टेशनवरून पायधुनी, भायखळा आणि नागपाडाकडे जाणाऱ्या वाहनांनी BMC रोड- मेट्रो जंक्शन- लोकमान्य टिळक मार्ग चकालाकडून डावीकडे वळण घेत जे. जे. जंक्शन- दोन टाकी- नागपाडा जंक्शन- खडा पारसी जंक्शनपासून पुढे इच्छित स्थळी जाता येईल.