मुंबई – मनुख हिरेन हत्या प्रकरण आणि अंबानींच्या घराच्या बाहेर स्फोटके ठेवण्यात आल्याचे प्रकरण या संबंधात एनआयएने आज अखेर मुंबईचा बडतर्फ एपीआय सचिन वाझे याच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात वाझे याच्या खेरीज माजी एन्काऊंटर स्पेशॅलिस्ट प्रदीप शर्मा आणि अन्य काही पोलिस अधिकाऱ्यांनांही आरोपी करण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात कोर्टाने वाझे प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी तीस दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत संपायला दोन दिवस बाकी असतानाच एनआयएने हे आरोपपत्र दाखल केले. या वर्षी 25 फेब्रुवारी रोजी मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलिया या इमारतीच्या जवळ जिलेटीन स्फोटके असलेली एक गाडी आढळून आली होती.
ही गाडी मुंबईतील एक व्यावसायिक मनसुख हिरेन यांची असल्याचे स्पष्ट झाले होते. पण 5 मार्च रोजी मनसुख हिरेन हेच मृतावस्थेत आढळून आले होते. हा सारा प्रकार संपुर्ण देशभर गाजला होता.