Mumbai festival – दुबई फेस्टिव्हलच्या धर्तीवर मुंबईत प्रथमच 20 ते 28 जानेवारी दरम्यान मुंबई फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील पर्यटन स्थळे जागतिक नकाशावर पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या नऊ दिवसांच्या महोत्सवामध्ये सांस्कृतिक महोत्सव,
संगीत, नृत्य आणि सिनेमा इव्हेंट्स, फूडच्या कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून, या फेस्टीव्हलमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी गुरवारी (23 नोव्हेंबर) केले.
गिरीश महाजन यांनी गुरुवारी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबईफेस्टिव्हलच्या कार्यक्रमांची घोषणा केली. यावेळी फेस्टिव्हलच्या लोगो आणि संकल्प गीताचे लोकार्पण महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.