जयपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरूवारी राजस्थानच्या देवगढमध्ये सभा झाली. त्यावेळी त्यांनी गर्दीत बसलेल्या भाजपच्या 95 वर्षीय नेत्याला ओळखले. मोदींच्या त्या कृतीचे उपस्थितांनी जल्लोष करत स्वागत केले.
राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराची सांगता झाली. अखेरच्या दिवशी सभा घेत मोदींनी त्या राज्यातील जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. त्या सभेला वयाची नव्वदी पार केलेले भाजपचे नेते धरमचंद डेरासरिया हेही उपस्थित होते. डेरासरिया यांच्यावर नजर जाताच मोदींनी भाषणात त्यांचा उल्लेख केला. भाजपच्या विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी डेरासरिया यांनी आयुष्याची 6 दशके दिली. या वयातही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ते येथे उपस्थित राहिले आहेत.
त्यांच्या उपस्थितीमुळे राजस्थानमधील माझ्या अखेरच्या सभेचे मोल वाढले, अशी भावूक टिप्पणी मोदींनी केली. मोदींनी वयोवृद्ध नेत्याला अचूकपणे ओळखल्याने सभेला उपस्थित असणारे सर्वच चकित झाले. त्यातून मोदींची कृती उपस्थितांसाठी मोठ्या चर्चेचा विषय बनली.