मुंबई :- मुंबईतील चुनाभट्टी परिसरात आज सकाळी एका भरधाव आरसीसी मिक्सर ट्रकने चार वाहनांना धडक दिली. हा अपघात मुंबई ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळ घडला आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईतील चुनाभट्टी परिसरात आज सकाळी हा भीषण अपघात झाला आहे. भरधाव आरसीसी मिक्सर ट्रकने चार वाहनांना धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये वाहनांचा चुराडा झाला आहे.
या मिक्सर ट्रकने दोन ऍक्टिव्हा, एक मोटार सायकल आणि एक पीयुसी व्हॅनला धडक दिली. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच असलेल्या सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, अपघात घडल्यानंतर हा ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. हा अपघात नेमका कसा झाला? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.