पुणे – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व डेक्कन जिमखानाच्या तर्फे आणि पीएमडीटीएच्या संलग्नतेने आयोजित केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत ब्राझिलच्या लौरा पिगोस्सी, युक्रेनच्या मारियाना झकारल्यूक यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे.
या दोघींनी उपांत्य फेरीत अनुक्रमे ग्रेट ब्रिटनच्या इमेली वेबली-स्मिथ व रोमानियाच्या मिरीयम बियांका बुलगारु यांचा पराभव केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तिसऱ्या मानांकित लौरा पिगोस्सीने सहाव्या मानांकित इमेली वेबली-स्मिथचा 6-1, 6-1 असा एकतर्फी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. लौराने इमेलीचे आव्हान 1 तास 9 मिनिटात सहज परतावून लावले.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या चुरशीच्या लढतीत पाचव्या मानांकित युक्रेनच्या मारियाना झकारल्युकने दुसऱ्या मानांकित रोमानियाच्या मिरीयम बियांका बुलगारुचा टायब्रेकमध्ये (5)6-7, 6-4, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव केला. हा सामना 3 तास 13 मिनिटे चालला.
उपांत्य फेरी (महिला) – लौरा पिगोस्सी(ब्राझील) वि.वि. इमेली वेबली-स्मिथ (ग्रेट ब्रिटन) 6-1, 6-1; मारियाना झकारल्युक (युक्रेन) वि.वि. मिरीयम बियांका बुलगारु (रोमानिया) (5)6-7, 6-4, 6-4.