MS Dhoni On IPL Retirement : दिग्गज भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने आयपीएलनंतर आपल्या भविष्यातील योजना निश्चित केल्या आहेत. आयपीएलमधून निवृत्तीनंतर त्याला लष्कराची सेवा करायची आहे. एका कार्यक्रमात त्यानं याबदल सांगितले.
जेव्हा एका चाहत्याने त्याला विचारले की, क्रिकेटनंतर काय योजना आहेत, तेव्हा धोनीने उत्तर दिले की, ‘मी अद्याप याबद्दल फारसा विचार केलेला नाही. मी सध्या क्रिकेट खेळत आहे. क्रिकेटनंतर मी काय करणार आहे हे जाणून घेणे माझ्यासाठीही खूप इंटरेस्टिंग असेल. पण एक गोष्ट जवळपास निश्चित आहे. मला भारतीय सैन्यासोबत (indian army) आणखी काही वेळ घालवायचा आहे. कारण गेल्या काही वर्षांत मी हे करू शकलो नाही.’
दरम्यान, एमएस धोनीला 2011 साली भारतीय लष्कराने लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवी प्रदान केली होती. तो पैराशूट रेजीमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नल आहे. गेल्या दशकात तो अनेक प्रसंगी आर्मी ड्रेसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेलेला दिसला आहे.
आयपीएलमध्ये धोनीची जलवा कायम….
एमएस धोनी 42 वर्षांचा झाला आहे. 2019 मध्ये तो भारतीय संघाच्या जर्सीमध्ये शेवटचा क्रिकेट खेळला होता. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही तो आयपीएलमध्ये खेळत आहे. तो चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असून गेल्या मोसमात त्याने पुन्हा एकदा आपल्या संघाला चॅम्पियन बनवले.
Bajrang Punia : साक्षीच्या निवृत्तीनंतर बजरंग पुनियाचा धक्कादायक निर्णय; PM मोदींना पत्र लिहून केली…
गेल्या आयपीएल मोसमातही त्याने तळाला फलंदाजीसाठी येत उत्कृष्ट फलंदाजी केली होती. या वयातही तो फलंदाजी आणि कर्णधारपदाच्या बाबतीत इतर खेळाडूंना खूप मागे टाकत आहे. त्यामुळेच त्याने आतापर्यंत क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेतलेली नाही. तो आयपीएल 2024 मध्ये चेन्नई संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.