सांगली- सांगलीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील एका आईने आपल्या पोटच्या 2 वर्षाच्या बाळाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
रेवती संजय लोकरे, वय 26 असे आरोपी मातेचे नाव असून ज्ञानदा संजय लोकरे असे मृत बालकाचे नाव आहे. या प्रकरणी सांगलीतील संजयनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी आईला अटक केली आहे.
ज्ञानदा जन्मतःच गतीमंद व मानसिकदृष्ट्या विकलांग असल्याचा राग संशयित आईला होता. त्यातूनच तिने चिमुकलीचा एका हाताने गळा आणि दुसऱ्या हाताने तोंड दाबून निर्दयीपणे हत्या केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.