यवतमाळ – घरगुती वादातून आई आणि मुलीने नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उमरखेड तालुक्यातील भवानी गावात घडली. आई नंदा किशोर वानखेडे, मुलगी साक्षी वानखेडे (वय 16 रा. भवानी, तालुका उमरखेड, यवतमाळ) अशी मृत माय-लेकीची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर वानखेडे हा पत्नी नंदासह मुलगी आणि दोन मुलांसोबत भवानी येथे राहतो. गेल्या काही दिवांपासून पती किशोर आणि पत्नी नंदा यांच्यामध्ये काही घरगुती कारणावरून वाद सुरु होते. अशातच या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला असता राग अनावर होऊन नंदा यांनी आपल्या सोळा वर्षीय मुलगी साक्षीला सोबत घेऊन रात्रीच्या सुमारास गावापासून जवळ असलेल्या नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.