चंद्रपूर – कर्तव्य बजावून घरी परतताना महिला पोलिसाचा दुचाकी-ट्रक अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राजुरा तहसील कार्यालयाजवळ ही घटना घडली. मोनल बनकर असे अपघातात मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. त्या बल्लारपूर पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या.
मोनल या आपले दैनंदीन कर्तव्य बजावून त्यांच्या राजुरा येथील राहत्या घरी निघाल्या होत्या. मोनल या राजुरा तहसील कार्यालय मार्गावरील वर्दळीच्या भागातून जात असताना त्यांना आयशर ट्रकने मागून जोरदार दिल्य़ाने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावरील अतिक्रमण आणि बेशिस्त वाहतुकीमुळेच या महिला पोलिस कर्मचाऱ्याचा बळी गेल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.